स्मार्ट ग्राम झोळंबे

निसर्गरम्य वातावरण, समृद्ध परंपरा आणि साध्या माणसाचे गाव म्हणजे झोळंबे.. स्वच्छ,सुंदर आणि तंत्र स्नेही स्मार्ट ग्राम

स्मार्ट ग्राम झोळंबे

झोळंबे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली ग्रामपंचायत झोळंबे ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. झोळंबे गाव हे आधुनिकतेचा वापर करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणारं एक प्रगत आणि स्मार्ट गाव आहे. शिक्षण, स्वच्छता आणि शाश्वत आणि समृद्ध जीवनशैली - हीच आधुनिक गावाची ओळख आहे!

ग्रामस्थांच्या गरजा ओळखून पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सर्वत्र वीजपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम ग्रामपंचायत दक्षतेने करते. नागरी सुविधा, शासकीय कार्यालये आणि अद्ययावत शिक्षण! गावात आधुनिक शिक्षण आणि हरित उपक्रम यांना प्राधान्य देत ग्रामपंचायत “स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर झोळंबे ” घडविण्याचा संकल्प बाळगून सतत कार्यरत आहे. अशा कार्यक्रमांमुळे झोळंबे गावाला सन २०२२-२०२३ मध्ये “स्मार्ट ग्राम” पुरस्कार मिळाला होता.

झोळंबे ग्रामदेवता श्री देवी माऊली..!!

गावाची प्रगती आणि लोकसहभाग

झोळंबे ग्रामपंचायत शिक्षण, शेती, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात विविध उपक्रम राबवते. गावातील शाळा, आरोग्य केंद्र, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, तसेच महिला बचत गट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून समाजजागृती केली जाते. या कामांमुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढला असून गावाच्या प्रगतीला नवीन गती मिळाली आहे. झोळंबे गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वेळोवेळी सामूहिक सभा आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सभांमधून गावकऱ्यांचे प्रश्न, विकास आराखडे आणि नवे उपक्रम यावर चर्चा केली जाते. महिला बचतगट, युवक मंडळे आणि ग्रामपंचायत झोळंबे पदाधिकारी आणि अधिकारी सक्रियपणे सहभाग घेतात.

तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक स्पर्धा आणि आरोग्य शिबिरे यांसारखे कार्यक्रम गावातील एकतेचे आणि प्रगतीचे प्रतिक ठरतात. झोळंबे गावातील सामूहिक कार्यक्रमांमुळे गावातील एकोपा आणि सामाजिक जाणीव अधिक बळकट झाली आहे. प्रत्येक सण-उत्सव ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे आणि आनंद वाटण्याचे माध्यम ठरते. ग्रामविकासाच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. युवक वर्ग या उपक्रमांमधून नेतृत्वगुण शिकतो आणि समाजसेवेची भावना विकसित करतो. लोकसहभाग आणि एकत्रित प्रयत्नांतून ग्रामपंचायत झोळंबे आज एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून उभी राहिली आहे.

"गावाची खरी प्रगती तेव्हाच घडते, जेव्हा प्रत्येक हात विकासासाठी आणि प्रत्येक मन सहभागासाठी पुढे येते.”

ग्रामपंचायतचे सेवा -भावी उपक्रम

“आमचा मार्गदर्शक दृष्टीकोन स्पष्ट असेल आणि प्रयत्न सातत्यपूर्ण असतील, तर यश निश्चित आपल्या पावलांशी येते.”

दृष्टीकोन

गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकास साधण्याचा दृष्टीकोन बाळगते. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी पुरवणारे आदर्श व सुशासित गाव घडवणे. “स्वच्छ, सुशिक्षित, सक्षम व स्वावलंबी गाव निर्माण करणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.”

मिशन
  1. महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांसाठी विशेष उपक्रम राबवणे.

  2. ग्रामस्थांच्या गरजांवर केंद्रित राहून, सर्व सरकारी योजना पारदर्शकपणे व प्रभावीपणे राबवणे.

  3. पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करणे – जसे की रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व स्वच्छता.

  4. गावातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणे.

  5. ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून लोकशाही मूल्यांची जोपासना करणे.

  • 🏗️ ग्रामपंचायत परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये.

  • 🤝 ग्रामसभा व ग्रामपंचायत नियमांचे पालन करणे सर्व ग्रामस्थांना आवश्यक आहे

  • सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई आहे.

  • 🚫 उघड्यावर शौचालय जाणे पूर्णतः बंदी आहे.

ग्रामपंचायत झोळंबे

नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ईमेल

फोन

zolambegram@gmail.com

+91 9405470953