झोळंबे गावातील विकास कामे
स्मार्ट ग्राम झोळंबे येथील विकासाचे रंगीत क्षण










































आमच्या गावाबद्दल
स्मार्ट ग्राम झोळंबे हे एक निसर्गसंपन्न आणि प्रगतीशील गाव आहे, जे आपल्या संस्कृती आणि त्यांच्या शेतीत गर्व बाळगते.
श्री देवी माऊली मंदिर, झोळंबे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वसलेले झोळंबे गाव हे निसर्गसौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील श्री देवी माऊली मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असून, गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे येथे आढळणारी प्राचीन कवी-कला (शिल्पकला व नक्षीकाम), जी त्या काळातील कलात्मकता आणि धार्मिक भावना दर्शवते. मंदिरातील रचना, लाकडी कोरीव काम आणि पारंपरिक स्थापत्यशैली यामुळे हे मंदिर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते.
दरवर्षी येथे उत्सव, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात, ज्यामुळे गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकता अधिक दृढ होते.


झोळंबे गावातील प्रति पंढरपूर, दापटेवाडी, ( झोळंबे) पूर्वीच गोपाळपुर.
वै. ह. भ. प. पू. सद्गुरु वासुदेव महाराज याचा जन्म याच भूमीत झाला. त्यांच्या भक्ती सामर्थ्यावर त्यांनी पंढरपूरचा विठ्ठल झोळंबे गावी आणला. त्यामुळे त्या पवित्र भूमीत दर्शन घेताना भक्ताला पंढरपूरचाच भाव अनुभवायला मिळतो.डोंगराच्या कुशीत वसलेली ही वाडी,आजुबाजूला दाट जंगलाने वेढलेली आणि निसर्गाच्या शांततेने न्हाऊन निघालेली आहे.येथील शुद्ध, हवा पक्ष्यांचा किलबिलाट आणि विठोबाच्या मंदिरातून येणारी शांतता मनाला खरी प्रसन्नता आणि समाधान देतात.झोळंबे गावाची भूमी म्हणजे भक्ती,निसर्ग आणि अध्यात्म याच परिपूर्ण मिलन आहे.झोळंबे हे केवळ निसर्गाच नव्हे,तर परंपरा, श्रद्धा आणि पूर्वजांच्या आशीर्वादांचेही देणं आहे. कोंकणातील गावऱ्हाटी या बारा-पाच देवस्थानांच्या मर्यादित आणि पवित्रेत आजही जिवंत आहेत. प्रत्येक उत्सव हा केवळ सोहळा नसून,तो पूर्वजांनी घालून दिलेल्या मर्यादा, संस्कार आणि भक्ती भाव याचा वारसा आहे.हा क्षण केवळ उत्सव नव्हता,तर एक आध्यात्मिक अनुभव पाहायला मिळतो.हा आहे झोळंबे गावाच्या भूमीचा अभिमान,जिथे देव, संस्कृती आणि माणुसकी एकत्र येऊन आध्यात्मिक आनंद निर्माण करतात.




प्रकल्प
स्मार्ट ग्राम झोळंबेतील महत्त्वाचे विकास प्रकल्प


शिक्षण सुधारणा
शाळांमध्ये आधुनिक सुविधा आणि संगणक शिक्षण


पाणीपुरवठा
गावात स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा योजना




ऊर्जा योजना
सौरऊर्जा वापरून स्वच्छ ऊर्जा उत्पादन
आरोग्य सेवा
गावातील आरोग्य शिबिरे आणि प्राथमिक उपचार
→
→
→
→


रानभाज्या महोत्सव


योगा वर्ग
ग्रामपंचायत झोळंबे
नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ईमेल
फोन
zolambegram@gmail.com
+91 9405470953
A website by Team Digital Nagri - www.digitalnagri.com
