शिक्षण, स्वच्छता आणि शाश्वत जीवनशैली - हीच आधुनिक गावाची ओळख!

स्मार्ट ग्राम झोळंबेतील महत्त्वाचे विकास उपक्रम

आरोग्य सेवा

ग्रामीण आरोग्य केंद्रात सुधारित सुविधा उपलब्ध

झोळंबे ग्रामपंचायतीची श्रमदानातून स्वच्छता मोहीम : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

झोळंबे, दोडामार्ग, ४ जून २०२६ – पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने झोळंबे ग्रामपंचायतीने श्रमदानाच्या माध्यमातून भव्य परिसर स्वच्छता मोहीम आज दि. ४जुन रोजी राबवली. या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने करण्यात आली.

लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचारी मैदानात या स्वच्छता मोहिमेत केवळ ग्रामस्थच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारीही सहभागी झाले होते. दोडामार्ग तालुका उपसभापती गणेशप्रसाद गवस, सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, सदस्य सुभाष गवस, सौ. संजना गवस, सौ. विनीता गवस यांनी स्वतः हात झाडू, पिवळ्या कचरा पिशव्या घेऊन रस्ते आणि सार्वजनिक जागा स्वच्छ केल्या.

ग्रामसेवक नामदेव परब, आरोग्य अधिकारी सौ. निकीता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि स्वच्छता यांचा समन्वय साधण्यात आला. सौ. रेखा गवस, शिवराम गवस, ओंकार गवस, सखाराम गवस, प्रभाकर गवस, सुरेश गवस, सतेज गवस, अमोल गवस, जानु कोकरे कर्मचारी बाबली गवस यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी या श्रमदानात हातभार लावला. महिला बचत गटातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

कचरा विल्हेवाटीसह जनजागृती

मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय परिसर, मुख्य रस्ते, सार्वजनिक विहिरी, मंदिर परिसर आणि शाळेभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याकडेला आणि ओढ्याजवळ टाकलेला प्लास्टिक, काच, इतर कचरा गोळा करून तो वेगळा करण्यात आला. ओला-सुका कचरा वर्गीकरणाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेत “एकच ध्यास - स्वच्छ झोळंबे गावास” असा फलक लावण्यात आला होता. सर्व सहभागींनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली.

मोहिमेनंतर बोलताना तालुका उपसभापती गणेशप्रसाद गवस म्हणाले, “सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी झोळंबे ग्रामपंचायत कायमच अग्रेसर राहिली आहे. आजचा श्रमदानाचा उपक्रम ही फक्त एक दिवसाची मोहीम नाही, तर आपण सर्वांनी स्वच्छता ही आपली सवय बनवली पाहिजे.”

सरपंच विशाखा नाईक यांनी महिलांना आवाहन करताना सांगितले की, “घराची स्वच्छता ही महिलांच्या हात असते. त्याचप्रमाणे गावाची स्वच्छताही आपण सर्व मिळून करू शकतो. ग्रामपंचायत यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल.”

मोहीमेच्या यशाबद्दल बोलताना उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी सांगितले, “लोकसहभागाशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होत नाही. आज झोळंबेकरांनी ती सिद्ध करून दाखवली आहे. यापुढे दर महिन्याला एक दिवस श्रमदानाचा ठेवण्याचा आमचा मानस आहे. उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानत, गावाला आदर्श स्वच्छ गाव बनवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.”

झोळंबे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे तालुकाभरातून कौतुक होत असून, इतर गावांसाठीही तो आदर्श ठरत आहे.

गावातील सामूहिक सभा आणि कार्यक्रम

झोळंबे गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वेळोवेळी सामूहिक सभा आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सभांमधून गावकऱ्यांचे प्रश्न, विकास आराखडे आणि नवे उपक्रम यावर चर्चा केली जाते. महिला बचतगट, युवक मंडळे आणि ग्रामपंचायत अधिकारी सक्रियपणे सहभाग घेतात. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक स्पर्धा आणि आरोग्य शिबिरे यांसारखे कार्यक्रम गावातील एकतेचे आणि प्रगतीचे प्रतिक ठरतात.

झोळंबे गावातील सामूहिक कार्यक्रमांमुळे गावातील एकोपा आणि सामाजिक जाणीव अधिक बळकट झाली आहे. प्रत्येक सण-उत्सव ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे आणि आनंद वाटण्याचे माध्यम ठरते. ग्रामविकासाच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. युवक वर्ग या उपक्रमांमधून नेतृत्वगुण शिकतो आणि समाजसेवेची भावना विकसित करतो. अशा कार्यक्रमांमुळे झोळंबे गावाला सन २०२२-२०२३ मध्ये “स्मार्ट ग्राम” पुरस्कार मिळाला होता.

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- 04/०4/1967

लोकसंख्या

1104

कुटुंब संख्या

266

शेतकरी संख्या

370

बागायत क्षेत्र

50-60हेक्टर

स्ट्रीट लाईट पोल

96

अंगणवाडी

01

जिल्हा परिषद शाळा

01

माध्यमिक शाळा

01

तलाठी ऑफिस

०१

आरोग्य उपकेंद्र

०१

सार्वजनिक विहीर

02

नळ कनेक्शन

170

महिला बचत गट

18

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

40

लागवडी योग्य क्षेत्र

600.80 हेक्टर

पुरुष

532

स्त्री

572

मतदारांची संख्या

812

पोस्ट ऑफिस

०१

एकूण क्षेत्रफळ

1093.26 हेक्टर

रेशन धान्य दुकान

01

आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात. प्रत्येक सेवा ही ठरलेल्या प्रक्रियेनुसार, नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने दिली जाते. आमचा उद्देश म्हणजे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सुविधा वेळेवर, योग्य व विश्वासार्ह रीतीने पोहोचवणे.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

जन्म प्रमाणपत्र

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

बांधकाम परवाना

बांधकाम परवाना आणि मंजुरी

कुटुंब नोंदणी

कुटुंब रेशनकार्ड आणि इतर दस्तऐवज

पाणी पुरवठा

पाणी पुरवठा आणि प्रमाणपत्र जारी करणे

घर पत्ता प्रमाणपत्र

राहत्या प्रमाणपत्र आणि घर पत्ता जारी करणे

ग्रामपंचायत झोळंबे

नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ईमेल

फोन

zolambegram@gmail.com

+91 9405470953