निसर्ग आणि परंपरेचे माहेरघर

झोळंबे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक निसर्गसंपन्न, शांत आणि प्रगतिशील गाव आहे. बागायती, शेती आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावाची ओळख हिरवाईने नटलेला परिसर, स्वच्छ वातावरण आणि पारंपरिक जीवनशैली यामुळे विशेष ठरते. डोंगराच्या कुशीत वसलेली ही वाडी आजूबाजूला दाट जंगलाने वेढलेली आणि निसर्गाच्या शांततेने न्हाऊन निघालेली आहे.

आहे. पारंपरिक घरे व जीवनशैली: गावातील मातीची घरे ही येथील पारंपरिक वास्तुकलेचे प्रतीक आहेत. ही घरे पर्यावरणपूरक असून उष्णतेपासून संरक्षण देणारी आहेत. गावातील लोकांचे जीवन साधे, शिस्तबद्ध व निसर्गाशी एकरूप झालेले आहे.

नद्या व नैसर्गिक साधनसंपत्ती: गावाच्या परिसरात वाहणाऱ्या नद्या व नाले हे शेतीसाठी पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. पावसाळ्यात हा परिसर अधिक हिरवागार व आकर्षक बनतो. एक झाड, एक जीवन – निसर्गाशी नातं जपणं आपलं कर्तव्य! झोळंबे - इथे जपली आहे ऐतहासिक परंपरा, जिथे प्रत्येक पाऊल सांगतं – ‘हे आपलं वैभव आहे!'

झोळंबे गावातील शिमगोत्सव हा केवळ उत्सव नसून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरा, संस्कार आणि लोक संस्कृतीची जिवंत दालन आहे.

गावातील शिमगोत्सव न्हावणाचा सोहळा पूर्वजांनी घालून दिलेल्या मागा मर्यादेनुसार आजही तितक्याच श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन, कळसाला हात न लावता बारा - पाचासह वेगाने धावत पुढे जातो तो क्षण पाहणाऱ्या साठी अत्यंत थरारक आणि अद्भुत असतो.त्या क्षणी परिसरात भक्तीची, श्रद्धेची आणि एका अनोख्या दैवी शक्तीची अनुभूती सर्वांना जाणवत असते.

रस्त्याचा दुतर्फा उभे राहून हजारो भाविक हा सोहळा भक्तीभावाने अनुभवत असतात.हा केवळ सणाचा भाग नसून झोळंबे गावाने पिढ्यान् पिढ्या जपलेली परंपरा,देवावरील निष्ठा आणि कोकणातील समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन आहे. जे प्रत्येकाला आपले मूळ आणि पूर्वजांच्या वारशाची आठवण करून देते.पण हा केवळ पाहण्याचा सोहळा नसतो.तो गाव,देव आणि पूर्वजांच्या परंपरेशी जोडणारा आत्म्याला स्पर्श करणारा दैवी अनुभव असतो.हाच तर खरा कोंकणातील पारंपरिक शिगमोत्सव थरार आहे.

देव, भक्ती आणि कोकणी संस्कृती

शिमगोत्सव

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव नाही तर आपली संस्कृती, परंपरा आणि गाव गाड्यांच्या आठवणी जपणारा उत्सव. लहानथोरांचा उत्साह,गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि एकत्र येऊन साजरा केलेला आनंद हेच आपल्या कोकणातल्या संस्कृतीचे खरं सौंदर्य आहे.हा उत्सव आमच्यासाठी श्रद्धा नाही तर संस्कृती, नातेसंबंध आणि गावाच्या परंपरेचे जतन आहे.गावातील प्रत्येक रस्ता,प्रत्येक घर आणि प्रत्येक मन बाप्पाच्या आगमनाने उजळून निघत.परंपरेतून आलेला हा वारसा पुढील पिढ्यानपर्यंत जपण हिच गावाची खरी जबाबदारी आहे. कोकणातील निसर्ग, एकत्र कुटुंबाची ऊब,नात्याची गोडी आणि गावातील नदीच्या साक्षीने होणारं गणपतीच विसर्जन.गावाच्या वेशीवरून,पायवाटांमधून आणि शेतात मधून गणरायाला निरोप देताना मनात एक वेगळं समाधान आणि भावनिक ओलावा जाणवतो.अशा परंपरांनी आपल्या गावाशी,मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवले आहे.

श्री.देवी माऊली प्रसन्न . जत्रोत्सव

गावातील जत्रा ही गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी गावातील देवस्थानांमध्ये मोठ्या उत्साहात जत्रा भरवली जाते. या जत्रेमध्ये गावकरी, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतात.जत्रेच्या काळात गावात आनंदाचे, उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते. विविध पारंपरिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावाची एकजूट आणि परंपरा अधिक दृढ होते.गावातील जत्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक दशावतारी नाटक. हे नाटक कोकणातील एक लोककला प्रकार असून त्यामध्ये धार्मिक कथा, सामाजिक संदेश आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असतो. पारंपरिक संगीत आणि वेशभूषा तसेच धार्मिक व ऐतिहासिक कथांचे सादरीकरण दशावतारी नाटकामुळे गावातील कला आणि परंपरा जिवंत राहतात आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचतात.गावात भक्तीभाव आणि श्रद्धेला विशेष स्थान आहे. जत्रेच्या काळात भाविक मोठ्या भक्तिभावाने देवदर्शन घेतात आणि पूजा-अर्चा करतात.देवस्थानात कीर्तन, भजन आणि आरती तसेच ग्रामदैवतावरील श्रद्धा व सामूहिक सहभाग आणि एकोपा. भक्तीमय वातावरणामुळे गावात आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते.

गणेशोत्सव

प्रकल्प

स्मार्ट ग्राम झोळंबेतील महत्त्वाचे विकास प्रकल्प

शिक्षण सुधारणा

नवीन शाळा इमारती आणि डिजिटल शिक्षण सुविधा

पाणी व्यवस्थापन

सिंचनासाठी जलसंधारण आणि जलशुद्धी प्रकल्प

ग्रामपंचायत झोळंबे

नैसर्गिक समृद्धी आणि आधुनिक विकासाचा ध्यास घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आदर्श गाव घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ईमेल

फोन

zolambegram@gmail.com

+91 9405470953